8 Feb 2026, Sun
Breaking

मुंबईत भारतातील पहिली टेस्ला सुपरचार्जिंग स्टेशन; विलक्षण वेगवान चार्जिंगचे नवे युग

टेस्ला

भारतातील पहिली टेस्ला सुपरचार्जिंग स्टेशन मुंबईत

टेस्ला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आघाडीवर असून, आता त्यांनी भारतात आपले पहिले सुपरचार्जिंग स्टेशन मुंबईतील बँड्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या “One BKC” येथे सुरू केले आहे. ही सुविधा देशात टेस्लाचे पहिले असून, भारतभर सुपरचार्जिंग नेटवर्क विस्तृत करण्याची ही पहिली पायरी मानली जात आहे.

या स्टेशनमध्ये चार V4 सुपरचार्जिंग स्टॉल्स असून ही DC चार्जिंगची सुविधा देतात, तर याशिवाय चार डेस्टिनेशन चार्जिंग (AC) स्टॉल्सही उपलब्ध आहेत. V4 सुपरचार्जिंग तंत्रज्ञानामुळे वाहनं अत्यंत जलद गतीने चार्ज होऊ शकतात, ज्यामुळे 14 मिनिटांत सुमारे 300 किलोमीटरची रेंज मिळू शकते. सध्या या सुपरचार्जिंग स्टेशनवर 11 kW पर्यंतची चार्जिंग सुविधा उपलब्ध असून, लवकरच हे वेग वाढण्याची शक्यता आहे.

टेस्लाने आपल्या चार्जिंग सेवांसाठी दोन वेगवेगळ्या किंमती निश्चित केल्या आहेत. DC चार्जिंगसाठी Rs 24 प्रति kW असून AC चार्जिंगसाठी Rs 11 प्रति kW आहे. हे दर टेस्ला वाहनधारकांना त्यांच्या प्रवासात सुविधा पुरवतील आणि इलेक्ट्रिक वाहने अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करतील.

मुंबईमध्ये या पहिल्या सुपरचार्जिंग स्टेशनविषयी टेस्ला कंपनीने म्हटले आहे की, ही एक सुरुवातीची पायरी आहे आणि भविष्यात मुंबईसह देशातील इतर प्रमुख शहरांतही अनेक सुपरचार्जिंग स्टेशन उभे केले जातील. टेस्लाचे उद्दिष्ट सध्याची इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याची अडचण दूर करून प्रवास अधिक सोयीस्कर बनविणे आहे.

पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही इलेक्ट्रिक वाहनांची वाढ मोठी गरज बनत आहे. ज्या शहरांमध्ये प्रदूषणाचा दर वाढतो आहे, तेथे इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापरासाठी आणि चार्जिंगची सुविधा जपणे आवश्यक आहे. टेस्लाचे सुपरचार्जिंग स्टेशन याच दिशेने मोठा टप्पा मानला जात आहे.

या स्टेशनच्या सुरूवातीसह मुंबईतील इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता जलद चार्जिंगची सोय मिळणार असून, यामुळे टेस्ला आणि अन्य इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल.


Follow Us On

Instagram :

https://www.instagram.com/policernews

X Account :

Tweets by PolicerNews

Read Also

कोल्हापूरमध्ये हजारो लोकांनी महादेवी परत आणा यात्रा केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *