गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. या भीषण अपघातात २४१ प्रवासी आणि कर्मचारी ठार झाले, परंतु एक आश्चर्यकारक घटना घडली – ब्रिटनमध्ये राहणारे आणि मूळचे भारतीय विश्वाश कुमार रमेश हे एकटेच जिवंत राहिले. अनेकांनी म्हटलं की, त्यांच्या सीट क्रमांक 11A मुळेच ते वाचले. ब्रिटनमधील माध्यमांनी या घटनेला “मिरॅकल ऑफ सीट 11A” असे संबोधले आहे.
११ जून २०२५ रोजी, अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI 171 ने टेकऑफनंतर केवळ ३३ सेकंदांत विमान एका इमारतीवर आदळले. विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज, १ कॅनेडियन आणि १२ कर्मचारी होते. अपघात इतका भयानक होता की, सर्व प्रवासी मरण पावले, फक्त सीट 11A वर बसलेले विश्वाश कुमार रमेश जिवंत राहिले.
४० वर्षीय विश्वाश हे मूळचे भारतीय असून गेली २० वर्षे लंडनमध्ये राहतात. ते भारतात नातेवाईकांना भेटून परत लंडनला जात होते. त्यांच्या भावाचा सीट वेगळा होता. अपघाताच्या वेळी विश्वाश म्हणाले, “टेकऑफनंतर अचानक दिवे बंद झाले आणि विमान इमारतीवर आदळले. मला वाटले मी मरेल, पण डोळे उघडले तेव्हा मी जिवंत होतो. सभोवताल मृतदेह, जळालेलं विमान आणि धूर होता. मी सीट बेल्ट काढून बाहेर पडलो.”
विशेष म्हणजे, विश्वाश यांची मूळ सीट वेगळी होती, पण शेवटच्या क्षणी त्यांनी सीट बदलून 11A घेतली. ही सीट आपत्कालीन दरवाज्याजवळ असल्याने ते सहज बाहेर पडू शकले. विमानाचा तो भाग जमीनवर राहिला, तर उर्वरित भाग इमारतीच्या छपरावर आदळला. त्यामुळे 11A वर बसल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले, तज्ञांनी सांगितले.
ब्रिटिश माध्यमांनी या घटनेला मोठ्या प्रमाणात कव्हर केले. “द गार्डियन”, “बीबीसी”, “द सन”, “डेली टेलिग्राफ”, “डेली स्टार”, “डेली मिरर” आणि “डेली मेल” या माध्यमांनी “मिरॅकल ऑफ सीट 11A” या शीर्षकांतून विश्वाश यांच्या अद्भुत बचावाची कथा मांडली. बीबीसीने त्यांचे धैर्य कौतुक केले. ब्रिटिश परराष्ट्र कार्यालयानेही त्यांना मदतीचे आश्वासन दिले आणि मृतांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या.
अपघातानंतर जखमी असूनही विश्वाश यांनी आपल्या भावाचा शोध घेतला. त्यांनी सांगितले, “माझ्या डोळ्यांसमोर लोक मरत होते… माझा भाऊ अजूनही सापडलेला नाही.” त्यांनी कुटुंबियांना फोन करून सांगितले, “मला कसे वाचले हे समजत नाही.”
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगितले की, विश्वाश यांच्या हातावर भाजल्या आहेत, पण त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो.
https://www.instagram.com/policernews
अहमदाबादच्या मेघानीनगरमध्ये विमान दुर्घटना: २४२ प्रवाशांसह एअर इंडिया विमान कोसळले