Table of content
1 . आधीचे नाव – पटौदी ट्रॉफी
2 . नवीन नाव – अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी
3 . कोणाच्या नावावर? – जेम्स अँडरसन (इंग्लंडचे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज)
सचिन तेंडुलकर (भारताचे महान फलंदाज)
4 . घोषणा – इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि BCCI यांनी संयुक्तपणे केली
5 . ट्रॉफीचे अनावरण – ११ जून २०२५, लॉर्ड्स, WTC फायनल दरम्यान
6 . ऐतिहासिक संदर्भ – सचिन तेंडुलकर – १५,९२१ टेस्ट धावा, २०० टेस्ट सामने
जेम्स अँडरसन – ७०४ टेस्ट विकेट्स
इंग्लंड आणि भारत या दोन क्रिकेट महासत्तांमधील कसोटी मालिकेला आता एक नवं, ऐतिहासिक नामकरण मिळालं आहे. इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावाने ही मालिका ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ म्हणून ओळखली जाणार आहे. बीसीसीआय आणि ईसीबी या दोन्ही क्रिकेट मंडळांनी मिळून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याआधी इंग्लंडमध्ये या मालिकेला ‘पटौदी ट्रॉफी’ आणि भारतात ‘अँथनी डी मेलो ट्रॉफी’ असं नाव दिलं जात होतं.आता ही मालिका ही मालिका ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ या नावाने ओळखली जाणार .
अँडरसन आणि तेंडुलकर – दोन दिग्गजांची गौरवशाली कारकीर्द
जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. नुकतीच त्याने १८८ कसोटीसामन्यानंतरनिवृत्ती घेतली. दुसरीकडे, सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामने खेळून क्रिकेटमध्ये नवा इतिहासरचला.दोघांनीही आपल्या कारकिर्दीत एकमेकांविरुद्ध अनेक संस्मरणीय लढतीदिल्यात.परिणामीया मालिकेला त्यांचं नाव देणं हे क्रिकेटच्या इतिहासात एक मोठं पाऊल मानलं जात आहे.
अँडरसनची भावना – “सचिनसोबत या मालिकेला नाव जोडणं ही मोठी गोष्ट”
या ट्रॉफीला स्वतःचं नाव मिळाल्यानंतर जेम्स अँडरसनने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, “ही माझ्यासाठी खूपमोठ्यासन्मानाची गोष्ट आहे.मलाअजूनही विश्वासबसतनाही की, माझं नाव सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजासोबत जोडलं गेलं आहे. मी लहानपणी सचिनला आदर्श मानायचो. त्याच्याविरुद्ध खेळणं, त्याच्या फलंदाजीचा अनुभव घेणं, हे माझ्यासाठी भाग्याचं होतं.”
अँडरसन पुढे म्हणाला, “सचिन हा खेळाचा खरा दिग्गज आहे. त्याच्यासोबत‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ ट्रॉफीचं नामकरण,हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी या सन्मानाचा मनापासून आनंद घेतो.”
भारताविरुद्ध खेळण्याचे आठवणी
अँडरसनने भारताविरुद्धच्यामालिकेतीलआपल्या आठवणीही शेअर केल्या. तो म्हणाला, “भारताविरुद्ध खेळणं हे नेहमीच खास असायचं. अॅशेसनंतर इंग्लंडसाठी सर्वात मोठी मालिका ही भारताविरुद्धचीच असते. भारतात खेळणं नेहमीच आव्हानात्मक असतं, पण आम्ही तिथे जिंकलो होतो, तो क्षण माझ्यासाठी खास आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकाही संस्मरणीय होत्या. भारताकडे नेहमीच काही जबरदस्त खेळाडू असतात.”
ट्रॉफीचं ऐतिहासिक महत्त्व
या मालिकेला ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’चं नाव देणं म्हणजे दोन्ही देशांच्या क्रिकेट परंपरेला आणि दिग्गज खेळाडूंना दिलेला सर्वोच्च सन्मान आहे.ह्यामुळेनव्या पिढीला या दोन दिग्गजांच्या कामगिरीची आठवण राहील आणि क्रिकेटमधील त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील.