टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेस (TCS) या भारताच्या सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीने 2025 साली जागतिक स्तरावर 12,000 कर्मचाऱ्यांना (जवळपास 2%) कामावरून कमी करण्याची घोषणा केली आहे. ही कपात कंपनीच्या नवीन व्यवसाय धोरणांमधील बदलांचा आणि ‘फ्युचर रेडी’ होण्याच्या प्रयत्नांमधून होणार आहे.
TCS सध्या आपले ऑपरेशन नवीन युगासाठी सज्ज करत आहे. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि नवीन तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे, जागतिक बाजारपेठेत विस्तार करत आहे, तसेच आपली कार्यपद्धती आणि स्वरूप बदलत आहे. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ पदांच्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे, कारण कंपनीने Workforce Restructuring चा निर्णय घेतलेला आहे.
पुणे आयटी मध्ये कोणावर परिणाम?
पुण्यातील आयटी हब्स – विशेषतः हिंजवडीसारख्या ठिकाणी – मोठ्या प्रमाणावर सेवा-आधारित कंपन्या आहेत. TCS च्या या निर्णयामुळे प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ कर्मचारी प्रभावित होतील. पुण्यात या स्तरावर पुनर्नियोजन किंवा नवीन नोकरीची संधी मर्यादित असल्याची बरीच तज्ज्ञांची मत आहेत. मुंबई, बंगलोर आणि हैदराबादसारख्या शहरांत तुलनेसाठी अधिक संधी आहेत, पण पुण्यातील समकक्ष पर्याय मर्यादित आहेत.
35-दिवसीय डिप्लॉयमेंट पॉलिसीचा ताण
TCS ने लागू केलेली 35 दिवसांची Deployment Policy कर्मचाऱ्यांवरील ताण वाढवते. जर कोणी कर्मचारी 35 दिवसांत नवीन प्रकल्पावर नियुक्त न झाल्यास, त्या कर्मचाऱ्यांवर आढावा घेतला जातो आणि त्याच्या नोकरीवर धोका निर्माण होतो.
पुनर्नियोजन व मदत
TCS म्हणते की, बऱ्याच कर्मचाऱ्यांना नव्या कौशल्यात ‘रिस्किल’ किंवा अन्य प्रकल्पात पुनर्नियोजित केले जात आहे. मात्र ज्या पदांसाठी ही शक्यता नाही, ते पद कमी होणार आहेत. कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य लाभ, समुपदेशन व बाह्य नोकरी शोधण्यासाठी मदत दिली जाते.
निष्कर्ष
टीसीएसच्या या निर्णयामुळे पुण्यातील आयटी सेवा क्षेत्रातील मध्यम व वरिष्ठ पदावरील तज्ज्ञांसाठी संधी मर्यादित राहतील. या बदलांमुळे स्थानिक नोकरी बाजारात नवीन आव्हानं उभी राहतात. पुण्यातील टेक प्रोफेशनल्ससाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि नवीन तंत्रज्ञानातील कौशल्ये प्राप्त करणे आता अत्यावश्यक झाले आहे.
Follow Us On
Instagram :
https://www.instagram.com/policernews
X Account :
Read Also
डोनाल्ड ट्रम्पचा कठोर इशारा: गूगल-माइक्रोसॉफ्टमधील भारतीय भरती थांबवा