27 Jul 2025, Sun

उन्नावमध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांनीच दोन निष्पाप मुलांना विषारी कोल्डड्रिंक देऊन ठार मारले

आजीला जंगलात फेकणाऱ्या नातवाचा अमानुषपणा: मुंबईत तिघांना अटक, समाजमन हादरले.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रम्माखेड़ा गावात घडलेली एक भयावह घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकली आहे. एका वडिलाने आपल्या दोन लहान मुलांना विषारी कोल्डड्रिंक देऊन ठार मारले, नंतर पोलिसांसमोर रडत आपल्या पत्नीवर या घटनेचा आरोप केला. मात्र पोलिसांच्या तपासात सत्य समोर आले आणि आरोपी वडिलांनी स्वतःच हे कृत्य केल्याची कबुली दिली.

उन्नाव कुटुंबातील वादातून घडलेले अमानुष कृत्य
रम्माखेड़ा गावातील रोहित रैदास यांनी 2021 मध्ये नेहा नावाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला. पण रोहितला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचे. 2023 मध्ये नेहा पतीला सोडून दुसऱ्या ठिकाणी गेली होती. रोहितने त्याबाबत पोलिसात तक्रार केली होती. काही दिवसांनी नेहा परत आली, पण घरगुती वाद, व्यसन आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांचे नाते आणखी खराब झाले.

उन्नाव हत्येचा कट आणि पोलिसांची चौकशी
१२ जून रोजी दारू पिऊन रोहित घरी आला आणि पत्नीशी भांडण झाले. नेहा मुलांना सोडून माहेरी गेली. त्यानंतर रोहितने भयानक कट रचून कीटकनाशक औषध कोल्डड्रिंकमध्ये मिसळून आपल्या ३ वर्षांच्या सोनाक्षी आणि ६ महिन्यांच्या ऋतिक या मुलांना दिले. या विषामुळे दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्याने स्वतःही विष पिऊन मरण्याचा नाटक केला, पण तो वाचला. नंतर पोलिसांना सांगितले की, पत्नीनेच मुलांना विष दिले.

पोलिसांनी उघडकीस आणले सत्य
मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला रोहितच्या आरोपांवर विश्वास ठेवला, पण पुढच्या तपासात त्याच्या कथेत तफावत आढळली. कॉल डिटेल्स, पुरावे आणि त्याच्या वागणुकीवरून पोलिसांना शंका आली. कडक चौकशीत रोहितने गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, पत्नीवर संशय घेऊन त्यानेच मुलांना विष दिले.

समाजाला धक्का देणारी घटना
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन निष्पाप मुलांचे प्राण पती-पत्नीच्या वाद, संशय आणि अहंकारामुळे गेल्यामुळे समाजाच्या मानसिकतेवर प्रश्न उभे राहिले आहेत. जर पोलिसांनी तत्परतेने तपास केला नसता, तर एक निर्दोष महिला चुकीच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होती.

कुटुंबातील तणाव आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व
ही घटना दाखवते की, कुटुंबातील तणाव, व्यसनाधीनता आणि संवादाचा अभाव गंभीर गुन्ह्यांसाठी कारण ठरू शकतो. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. समाज आणि प्रशासनाने फक्त गुन्हेगाराला शिक्षा देण्यापेक्षा कुटुंबातील तणाव कमी करण्यासाठी, मानसिक आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

https://www.instagram.com/policernews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *