8 Feb 2026, Sun
Breaking

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील गरोदर महिला मतदाराने मतदानाला प्राधान्य दिले.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव

चाळीसगाव

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका गरोदर महिला मतदाराने लोकशाहीसाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले. प्रसूतीची तारीख असतानाही चाळीसगावच्या कोमल पाटील यांनी मतदानाला प्राधान्य दिले. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले. चाळीसगावच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मातृशक्तीला सलाम असल्याची भावना आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.

राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणुकांची मतमोजणी उद्या लगेच होणार होती. पण आता ही मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. याचदरम्यान जळगाव जिल्ह्यातील एका गरोदर महिला मतदाराने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

कोमल पाटील यांनी प्रसूतीची तारीख असताना देखील मतदानाला प्राधान्य दिले. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले. चाळीसगावच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मातृशक्तीला सलाम असल्याची भावना आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली. प्रसूतीसाठी ऍडमिट होण्याआधी कोमल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावत एकप्रकारे सर्वांना मतदान करण्यास प्रेरित केले.

तब्बल आठ ते १० वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने कार्यकर्ते, उमेदवार आणि मतदारांची मतदानाबाबत कमालाची उत्सुकता आणि उत्साह आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होत आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी १७ हजार ३६७ कंट्रोल युनिट आणि ३४ हजार ७३४ बॅलेट युनिट वापरली जात आहेत.


Follow Us On

Instagram :     

https://www.instagram.com/policernews

X Account :      

Tweets by PolicerNews

Read Also

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *