8 Feb 2026, Sun
Breaking

पक्के वाहन परवानासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट अनिवार्य

वाहन परवाना

पुणे: राज्यात वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविण्याची प्रक्रिया आता अधिक कडक, पारदर्शक आणि सुटसुटीत होणार आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चालक प्रशिक्षण व परवाना चाचणीतील त्रुटी दूर करण्यासाठी परिवहन विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी परिपत्रक काढले असून, पक्के लायसन्स मिळविण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट अनिवार्य करण्यात आले आहे.​

वाहन परवाना नवीन नियमावलीची मुख्य बाबी


ऑनलाइन अपॉइंटमेंटशिवाय पक्क्या लायसन्सची चाचणी स्वीकारली जाणार नाही.

एका दिवशी कोणत्या वाहन प्रकारासाठी किती वेळ द्यायचा , किती चाचण्या घ्यायच्या याचे वेळापत्रक कार्यालयांनी काटेकोर पाळायला पाहिजे.

नियुक्त अधिकारी चाचणी मैदानावर उपस्थित राहणार असून, चाचणीची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये केली जाईल.

सेवा हमीअंतर्गत परवाना प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

सीसीटीव्ही देखरेख, सुरक्षित रेकॉर्डिंग आणि गैरव्यवहार आढळल्यास तत्काळ शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.​

वाहन परवाना चाचणी प्रक्रियेत सीसीटीव्ही देखरेख
राज्यात ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या मार्गिकांवर सीसीटीव्ही देखरेखीखालीच चाचणी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. संपूर्ण चाचणीचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवून तपासणी समितीला सादर करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयांवर असेल. यामुळे नव्या नियमामुळे लायसन्स काढताना पारदर्शकता येणार आहे.​

वाहन परवाना पुनर्चाचणी आणि अहवाल
वाहन चाचणीत अनुत्तीर्णतेचे प्रमाण केवळ १० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, उत्तीर्ण झालेल्या अर्जांपैकी पाच टक्के अर्जदारांची पुनर्चाचणी घेऊन त्याचा अहवाल दर महिन्याच्या अखेरीस सादर करणे बंधनकारक आहे.​

नवीन नियमांचे महत्त्व
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे लायसन्स प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार असून, सुरक्षित वाहनचालक घडविण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.​


Follow Us On

Instagram :     

https://www.instagram.com/policernews

X Account :      

Tweets by PolicerNews

Read Also

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *