27 Jul 2025, Sun

मेघालयातील हनीमून मर्डर: इंदौरमध्ये आखलेली कटकारस्थान

मेघालयमधील ‘हनीमून मर्डर’ प्रकरणाने देशभरात खळबळ माजवली आहे. इंदोरचे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे नवविवाहित दाम्पत्य २० मे रोजी हनीमूनसाठी मेघालयला गेले. काही दिवसांतच राजा रघुवंशी यांचा मृतदेह एका खोल दरीत सापडला, तर सोनम बेपत्ता झाली. या घटनेच्या मागे इंदोरमध्ये आखलेले एक भयंकर कटकारस्थान उघडकीस आले आहे.

राजा आणि सोनम यांचा विवाह ११ मे रोजी इंदोरमध्ये झाला. सोनमचा राज कुशवाहा नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने, लग्नानंतर तिने राजासोबत मेघालयमध्ये हनीमूनसाठी जाण्याचा आग्रह धरला. मात्र, हा हनीमून नव्हे तर एक कुटिल कट होता, असे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

सोनमने आपल्या प्रियकर राज कुशवाहा आणि तीन सुपारी किलर्स – विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी – यांच्यासोबत मिलून राजा रघुवंशीची हत्या करण्याची योजना आखली. हे सर्वजण मेघालयमध्ये सोनम आणि राजाच्या मागावर गेले. सोनमने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती आणि आपल्या पतीच्या ठिकाणाबद्दल गुन्हेगारांना माहिती देत राहिली. २३ मे रोजी सोहरा परिसरात सोनम, राजा आणि तिघेजण एकत्र दिसले. तिथेच राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह २ जून रोजी एका खोल दरीत सापडला, ज्यामुळे सुरुवातीला पोलिसांना लुटीचा संशय आला.

राजाच्या मृत्यूवर सोनमचा हात असल्याचा संशय वाढल्यावर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली. सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केले, तर तिच्या प्रियकरासह तिघा सुपारी किलर्सना इंदोर आणि सागर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. सर्व आरोपींना मेघालय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी शिलाँगला नेण्यात आले आहे.

राजाच्या कुटुंबीयांनी सोनमवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सोनमने हनीमूनचे सर्व नियोजन केले आणि राजाकडून मोठी रक्कम आणि महागडे दागिने घेतले. सोनमच्या कुटुंबाने या आरोपांना नकार दिला आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी सोनम आणि तिच्या साथीदारांना मुख्य आरोपी म्हणून मान्यता दिली असून, सोनमनेच ‘मारण्याचा’ इशारा दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *