26 Jul 2025, Sat

नितीन गडकरी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान

नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुण्यात १ ऑगस्ट २०२५ ह्या दिवशी प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार बहाल केला जाईल. हा पुरस्कार १९८३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने स्थापित केला होता.

हा पुरस्कार दरवर्षी १ ऑगस्ट ह्या दिवशी, जो लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे, दिला जातो. ह्या पुरस्कारातून देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते.

गडकरी साहेब हे ह्या पुरस्काराचे ४३वे मानकरी ठरतील. ह्या पुरस्कारासोबत ₹१ लाख रुपये आणि सन्मानपत्र दिले जाते.

अगोदर ह्या पुरस्काराने अनेक प्रतिष्ठित नेते आणि समाजसेवक सन्मानित झाले आहेत, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, समाजसेविका सुधा मूर्ती, प्रणब मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार, राहुल बाजाज, सिरस पूनावाला, शंकर दयाळ शर्मा, वर्गीस कुरियन, एम.एस. स्वामीनाथन, शीला दीक्षित, टेसी थॉमस ह्यांचा समावेश आहे.

यंदाचा पुरस्कार १ ऑगस्ट २०२५ ह्या दिवशी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिर येथे गौरव सोहळ्यात प्रदान केला जाईल.

Follow Us On

Instagram :

https://www.instagram.com/policernews

X Account :

Tweets by PolicerNews


Read Also

ठाणे भांडुप येथे भिंत पडल्याने घरं उद्ध्वस्त झाली; कुणीही जखमी झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *