गेल्या दोन दिवसांत इंडिगोने देशातील ९०० हून अधिक उड्डाणे रद्द केल्याने विमान वाहतूक क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास उधळला आहे. या प्रकरणात इंडिगोमुळे विमानाचा प्रवास रद्द झालेल्या प्रवाशांना आकासा एअर, एअर इंडिया आणि स्पाइसजेट सारख्या कंपन्यांच्या वाढलेल्या तिकीट दरांचा सामना करावा लागत आहे.
मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू आणि चेन्नई-हैदराबाद यांसारख्या प्रमुख मार्गांवर अचानक मागणी वाढल्यामुळे, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांमध्ये दोन ते चार पटीने वाढ केली आहे. सामान्यतः ₹५,००० ते ₹७,००० च्या दरम्यान उपलब्ध असलेल्या तिकीटांचा दर आता ₹१५,००० ते ₹२०,००० इतका आहे. मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट ३०-३५ हजारांना मिळत आहे. परतीचे तिकीट हवे असेल तर त्यासाठी ५९-६० हजार रुपये मोजावे लागतात.
इंडिगोच्या गोंधळामुळे अडकलेल्या प्रवाशांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे, नाईलाजाने त्यांना हे वाढलेले दर देऊन प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे ‘संकटात संधी’ साधण्याचा आणि प्रवाशांची अक्षरशः आर्थिक लूट करण्याचा क्रूर प्रकार सुरू झाला आहे.
इंडिगोच्या उड्डाण रद्दीचा मुख्य कारण नवीन ड्युटी टाइम लिमिट (FDTL) नियम आहेत. या नियमांमुळे पायलट आणि क्रू व्यवस्थापनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. इंडिगोच्या ऑपरेशनल व्यवस्थेत तांत्रिक अडथळे, वाढलेली वाहतूक, आणि वाईट हवामान यांचाही परिणाम झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, नवीन नियमांमुळे विमान कंपन्यांना आपल्या क्रू रोस्टरिंगमध्ये मोठी बदल करावी लागणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) इंडिगोच्या उड्डाण रद्दीच्या प्रकरणात लक्ष ठेवून आहे. मात्र, संकटकाळात इतर कंपन्यांकडून होणाऱ्या या ‘किंमत वाढ’ किंवा दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाहीये, ज्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इंडिगोने DGCA ला सांगितले आहे की, फुल ऑपरेशनल स्टेबिलायझेशन फेब्रुवारी २०२६ पर्यंत होईल. या घटनेमुळे विमान कंपन्यांच्या नियमांवर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. तसेच, प्रवाशांना आर्थिक लूटीपासून वाचवण्यासाठी सरकारने त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
इंडिगोच्या उड्डाण रद्दीमुळे विमान कंपन्यांच्या व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रतिस्पर्धी कंपन्यांनी तिकीट दर वाढवून प्रवाशांची आर्थिक लूट केली आहे. सरकारने यावर त्वरित हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
Follow Us On
Instagram :
X Account :
Read Also

