उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील १६ वर्षीय अहाना ही अकरावीत शिकणारी हुशार मुलगी होती. तिला बाहेरचं खाण्याची, विशेषतः पिझ्झा, बर्गर, चाऊमीन आणि मॅगी यांची खूप आवड होती. घरच्यांनी वारंवार मनाई केली तरीही ती गुपचूप जंकफूड खात असे.
आतड्यांना झालं इन्फेक्शन, ऑपरेशन झालं तरी मृत्यू
सप्टेंबर महिन्यात अहानाला पोटाचा त्रास सुरू झाला. नोव्हेंबरमध्ये त्रास असह्य झाल्याने तिला मुरादाबादच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत डॉक्टरांना धक्का बसला. जंकफूडच्या अतिसेवनामुळे अहानाच्या आतड्या एकमेकांना चिकटल्या होत्या आणि त्यात छिद्र पडले होते. गंभीर संसर्गामुळे तिची प्रकृती खालावली होती. ३० नोव्हेंबर रोजी तिच्या आतड्यांचे यशस्वी ऑपरेशन झाले, पण त्यानंतरही तिचं शरीर दिवसेंदिवस कमकुवत होत गेलं.
अचानक हार्ट फेल, मृत्यू
तिला डिस्चार्ज करण्यात आलं, पण काही दिवसांनी तिची प्रकृती पुन्हा बिघडली. तिला दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोडी सुधारणा झाल्यानंतर रविवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि अवघ्या १६ वर्षीय अहानाचा मृत्यू झाला.
डॉक्टरांचा इशारा
डॉक्टरांनी सांगितले की, मैद्यापासून तयार केलेले पदार्थ व त्यातील विषारी रसायनं पचायला अवघड असतात. अशा पदार्थांचं सतत सेवन केल्याने आतड्यांमध्ये जळजळ होऊन हळूहळू त्यांचं कार्य थांबतं. अहानाच्या मामांनी सांगितले की, डॉक्टरांनी तिच्या मृत्यूचे मुख्य कारण जंकफूडमुळे निकामी झालेली आतडी हेच दिले आहे.
आतड्यांचे आजार आणि लक्षणं
ICMR च्या रिसर्चनुसार, १० कोटी लोकांना आतड्याचा आजार आहे. IBS चा धोका १५ टक्के वेगाने वाढत आहे. आतड्याचा आजार झाल्याची काही लक्षणं दिसून येतात. जसे की, गॅस, बद्धकोष्ठता, सतत डोकेदुखी आणि स्किन अॅलर्जीसोबतच वजन वाढणं ही आतड्याचा आजार असल्याची काही लक्षणं सांगता येतील.
पचन तंत्र सुधारा
पचन तंत्र सुधारण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे, रोज अॅलोव्हेरा, आवळा खा. बाहेरचं खाणं टाळा. रात्री हलकं जेवण करा. हिरव्या पालेभाज्या, फळं खा, याने पचन तंत्र सुधारतं. तसेच आतडीही आतून साफ होते.
Follow Us On
Read Also

