8 Feb 2026, Sun
Breaking

आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या कारचा धक्का, चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी!

आमदार ज्ञानेश्वर कटके मर्सिडीज अपघात

भरधाव कारने उडवली चिमुकली, आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा व्हिडिओ व्हायरल!

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील बोऱ्हाडेमळा परिसरात रविवारी (३० नोव्हेंबर २०२५) दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चार वर्षीय बालिका शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे यांना जोरदार धडक दिली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुभ्रा यांच्यावर त्वरित उपचार सुरू आहेत, पण त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत होते. बोऱ्हाडेमळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोऱ्हाडे ही चार वर्षीय बालिका महामार्ग ओलांडत होती. एका कारच्या आडून ती अचानक आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार (क्र. एमएच१२, एनएक्स १३९१) समोर आली. चालकाने तत्काळ ब्रेक मारला, पण गाडीचा वेग जास्त असल्याने त्या मुलीला जोराची धडक बसली. तिला चेंडूसारखे उडवून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर आणले. यात तिच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली. तिचे दात पडले आणि चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या.

आमदार ज्ञानेश्वर कटके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ खाली धाव घेऊन शुभ्राला मदत केली आणि त्यांच्याच कारमधून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुण्यातील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने चार वर्षीय बालिकेला धडक दिल्याची घटना राजकीय वादाचे रूप घेत आहे. अनेकांनी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारच्या वेगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, बालकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे.

ही घटना बाल सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर आहे. अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यावर विशेष लक्ष देणे आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, तरच भविष्यात अशा घटना टाळता येतील.


Follow Us On

Instagram :     

https://www.instagram.com/policernews

X Account :      

Tweets by PolicerNews

Read Also

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *